स्टालिनग्राडची लढाई दुसऱ्या महायुद्धातील सर्वांत हिंसक लढत ठरली. जर्मनीचा त्यात दारुण पराभव झाला. किंबहुना तो तिचा इतिहासातील सर्वांत मोठा पराभव होता

जर्मन आणि रशियन सेनादलात १९४२च्या उत्तरार्धात झालेली स्टालिनग्राडची लढाई ही दुसऱ्या महायुद्धातील सर्वांत घनघोर लढायांपैकी एक. त्यात जवळजवळ २० लाख लोकांची जीवहानी झाली. ते जर्मनीसाठी एक कठोर वळण ठरले. त्यांना पूर्व आघाडीवरील सैनिकांच्या संख्येतील क्षती भरून काढण्यासाठी इतर भागांतून सैन्य हलवावे लागले. रशियाचे खच्ची झालेले अवसान स्टालिनग्राडमधील विजयानंतर पुनश्च भरून आले.......